पुण्याच्या इंदापूर शहरात जुना टेंभुर्णी परिसरातील बेकायदेशीर मंदिर आणि गणेश मूर्ती नगरपरिषदेने मोठ्या पोलीस बंदोबस्तामध्ये हटवलीय. शासकीय जागेत कोणतीही परवानगी न घेता ही मूर्ती स्थापन केल्याचा नगरपरिषदेनं दावा केलाय. या ठिकाणावरून मूर्ती संबंधितांनी तात्काळ हटवावी अशी थेट सूचना नगर परिषदेच्या मुख्याधिकार्यांनी गणेश भक्तांना दिली होती. मात्र संबंधितांकडून कोणतीही कारवाई न झाल्याने अखेर इंदापूर नगर परिषदेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे मंदिर आणि गणेश मूर्ती स्थापन केलेल्या ठिकाणावरून हटवले आहे.
Pune | Illegal Ganesh temple and idol removed in Indapur; Municipal Council carries out action under police protection.