Tennis Cricket । ISPL। Santosh Nanekar । शून्यातून कोट्यवधींची कंपनी उभारणाऱ्या मराठी तरुणाची कहाणी

टेनिस क्रिकेट खेळून नाही तर लोकांना दाखवून उद्योग उभारणारा संतोष नाणेकर हा कमालीची चिकाटी आणि जिद्दीचं मूर्तीमंत उदाहरण आहे. कॉलेजमध्ये असताना सगळ्या विषयात नापास झालेल्या संतोषला आयुष्यात असंख्य अपमान पचवावे लागले. त्याच्यावर टीका करणारे, टोमणे मारणारेही आज त्याचं कौतुक करतात. Shreerang Khare यांनी 'खरे सांगेन' च्या मंचावर संतोषची मुलाखत घेतली. यामध्ये त्याने भिकाऱ्याच्या बाजूला झोपण्यापासून सचिन तेंडुलकर यांच्यासोबत ISPL पर्यंतच्या प्रवासाबद्दल, सुरुवातीच्या संघर्षापासून सूर्यकुमार यादव याला कसं गप्प बसवलं इथपर्यंत भन्नाट किस्से सांगितले. त्याची ही मुलाखत मराठी तरुणांसाठी नक्की प्रेरणादायी ठरेल.